नाशिकची दंगल सरकार पुरस्कृत आहे. महायुतीच्या विरोधात सर्वे असल्याने अशा पद्धतीने मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न केला जात आहे. महायुतीचे सरकार जातीयवादी आहे. राज्यात अस्थितरता निर्माण केली जात आहे. रामगिरी हे कसले संत? भाजपचे पोसलेले हे संत आहेत. मुळात संत हे माणुसकीची शिकवण देतात, तेढ निर्माण करत नाहीत असे ताशेरे ओढत विधानसभा विरोधो पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांभाळून बोलावे असा सबुरीचा सल्ला दिला.
उद्वव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा असे सांगून दोघांनाही कोंडीत पकडले. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, घाई काय आहे, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आम्ही तीनही पक्ष मिळवून ठरवू असे सांगत सावध पवित्रा घेतला.
राज्यात सुमारे 150 मतदारसंघात काँग्रेसला आघाडी आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही विदर्भातील अधिकाधिक जागा मागणार आहोत. विदर्भावर आमचा दावा आहे. तीनही पक्षाच्या संयुक्त बैठकीत यावर तोडगा निघेल आणि काँग्रेसला अधिक जागा मिळेल असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. आशिष शेलार यांची भाषा गुंडगिरीची आहे. सोलून काढा असे सांगणे चुकीचे आहे. यामुळेच सरकार पुरस्कृत सर्व सुरू असल्याचा आरोप केला.महायुतीला पराभव दिसत असल्याने विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र निवडणूक कधीही घेतल्या तरी महायुतीला पराभूत करण्याचा लोकांनी निर्णय घेतलाय असा दावा वडेट्टीवार यांनी केला.