

नागपूर : अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ प्रकाश मोगले यांची निवड करण्यात आली असून उद्घाटक डॉ एम एल परिहार तर स्वागतध्यक्ष डॉ. परमानंद बागडे आहेत. अ भा. आंबेडकरी साहित्य संस्कृती संवर्धन महामंडळ महाराष्ट्र व निळाई आयोजित १६ वे अ. भा आंबेडकरी साहित्य संमेलन नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. २१ ते २३ मार्च दरम्यान कामठी रोड येथील सुगत बुध्द विहार चाक्स कॉलनी सभागृहात होणाऱ्या संमेलनात राज्यभरातील नामवंत साहित्यिक हजेरी लावणार आहेत.
या कार्यक्रमास प्रा. वसंत शेंडे, आनंद गायकवाड, विजय गवई, डॉ अशोक इंगळे, प्रा भास्कर, प्रा. पाटील, गजानन बन्सोड, प्रा. एन. व्ही ढोके, नरेंद्र शेलार, प्रा. संजय शेजव, प्रा.कैलास वानखडे, संजय डोंगरे, भारत लढे, पत्रकार अनिल वासनिक, माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य, अॅड शैलेश नारनवरे, प्रा विजया मुळे, विद्या भोरजारे, प्रा. विशाखा कांबळे, प्रा अस्मिता दांरुडे, दिपाली टेकाम, प्रा. सिमा मेश्राम, अमृत बन्सोड, डॉ. सुरेश खोब्रागडे, रसपाल शेंद्रे, रमेश बुरबुरे, विनोद बुरबुरे, प्रा प्रंशात धनविज, प्रा. पंकज वाघमारे, अशोक खन्नाडे, संध्या राजूरकर, सुरेश साबळे, गौतम तुपसुंदरे, प्रा शांतरक्षित गांवडे, हे वक्ते सहभागी होणार आहेत. दोन दिवसीय कार्यक्रमात परिसंवाद, परिचर्चा, विधान चर्चा, कथाकथन नाटक, कविसंमेलन, गजल, एकपात्री प्रयोग, जलसा पुस्तक प्रकाशन, आंबेडकरी कार्यकर्त्याचा सत्कार गौरव करण्यात येईल, अशी माहिती मुख्य संयोजक प्रवीण कांबळे, व सहसंयोजक सुरेश वंजारी यांनी दिली.