महाकुंभातील पवित्र ‘संगम जल’चे रामटेकमध्‍ये भव्‍य स्‍वागत

रामटेक गडमंदिरात पवित्र जलाद्वारे उद्या अभिषेक
Nagpur News
महाकुंभातील पवित्र ‘संगम जल’चे रामटेकमध्‍ये भव्‍य स्‍वागत करण्यात आले.
Published on
Updated on

नागपूर : प्रयागराज येथे सध्या सुरू असलेल्या महाकुंभादरम्‍यान त्रिवेणी संगमावर कोट्यवधी लोक पवित्र स्‍नानाचा लाभ घेत आहेत. पण ज्‍यांना तेथे जाणे शक्‍य नाही अशांनाही या पवित्र संगम जलाच्‍या दर्शनाची अनुभूती घेता यावी, या अनुषंगाने तेथील हजारो लिटर पवित्र जल बुधवारी (दि.12) नागपूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र रामटेक येथे आणण्‍यात आले. या पवित्र संगम जलाचे रामटेककरांनी गांधी चौक येथे ढोलताशाच्‍या गजरात स्वागत करण्यात आले.

गांधी चौक ते गडमंदिर अशी भव्‍य शोभायात्रा काढण्‍यात आली. या शोभायात्रेत हजारोंच्‍या संख्‍येने भाविक उपस्‍थ‍ित होते. शोभायात्रेच्‍या मार्गावर रांगोळ्या काढण्‍यात आल्‍या होत्‍या. उद्या रामटेक गडमंदिरात प्रभू श्रीरामाला या पवित्र जलाद्वारे अभिषेक केला जाणार आहे. त्‍यानंतर हे पवित्र जल कलश नागपूरकडे रवाना होणार असून सकाळी 8 वाजता कल्‍याणेश्‍वर मंदिर, तेलंगखेडी येथे येणार आहे. त्‍यानंतर 9 वाजता राममंदिर रामनगर, 9.40 वाजता दुर्गा मंदिर प्रतापनगर, 10.30 वाजता टेकडी गणपती मंदिर, सकाळी 11.30 वाजता कल्‍याणेश्‍वर मंदिर महाल तर दुपारी 12.15 वाजता रमणा मारुती मंदिर हे पवित्र जल कलश आणले जातील. कांचनताई गडकरी, अमेय हेटे, अभय व अंजली चोरघडे, नरेंद्र हेटे, साकेत दशपुत्र, आशुतोष शेवाळकर, रवी वाघमारे, काळे, राजेश अवचट, गुणवंत पाटील, डॉ. राजेश रथकंठीवार यांची प्रामुख्याने उपस्‍थ‍िती राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news