

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ हायकोर्ट परिसरात आज मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास बॉम्बच्या अफवेने तारांबळ उडाली. एका बॅगमुळे ही अफवा उडाली.
विशेष म्हणजे दोन दिवसांपासून ही बॅग एका वकिलाची बॅग या ठिकाणी होती. यात एक मोबाईल असल्यामुळे आणि तो वाजत होता अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात पोलिसांना फोन येताच लागलीच पोलिस यंत्रणा, बॉम्बशोधक, नाशक पथकाने उच्च न्यायालय परिसरात धाव घेतली. लागलीच लोकांची गर्दी जमली. मात्र शेवटी ही अफवाच असल्याचे निष्पन्न होताच पोलिस, वकील सर्वांनीच सुटकेचा श्वास घेतला.