RSS Headquarters Bomb Threat | नागपूर संघ मुख्यालयी बॉम्बच्या ईमेल नंतर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

गुन्हेशाखा, बॉम्बस्फोट्क,बॉम्ब शोधक पथक तातडीने घटनास्थळी दाखल
RSS Headquarters
RSS Headquarters Pudhari
Published on
Updated on

नागपूर : पुणे महापौर कार्यालय, विधानभवन आणि नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसर, डॉ हेडगेवार स्मृती भवन या ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याच्या ईमेल नंतर आज (दि.१०) या सर्व ठिकाणी सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आली आहे.

गुन्हेशाखा, बॉम्बस्फोट्क,बॉम्ब शोधक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.सर्वत्र कसून तपासणी करण्यात आली मात्र कुठेही काही संशयास्पद वस्तू नसल्याचे उघडकीस आले. खलिस्तान नॅशनल आर्मी या संघटनेचे नाव असलेल्या या मेलचा नेमका सूत्रधार कोण हे शोधून काढण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आल्याची माहिती असून अधिक तपशील सखोल चौकशीनंतरच देता येईल अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news