

नागपूर : पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा रोहित खोपडे यांनी आज पक्ष सोडल्या विषयी घुमजाव केले आहे.आपण भाजपातच असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षश्रेष्ठी भविष्यात आपला विचार करतील , असा विश्वास व्यक्त केला आहे.
विरोधक सोशल मीडियावर आपली बदनामी करीत असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनी रोहित खोपडे यांना काँग्रेसमध्ये येण्याची, युवक काँग्रेसचे चांगले पद देण्याची ऑफर एका निवेदनाद्वारे दिली होती. आज खोपडे पिता पुत्रांनी वंजारी यांच्या या निवेदनाचा समाचार घेतला आहे.
वंजारी यांनी आमचे घर फोडण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा दिला आहे. रोहित खोपडे यांच्या मते,मी प्रभाग 21 मधून पार्टीकडे उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने संजय अवचट यांना उमेदवारी दिली. मी सुद्धा त्याच्या फॉर्ममध्ये अनुमोदक म्हणून सही केली आहे. मी पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे म्हटले आहे.
दरम्यान,काँग्रेस आमदार अभिजित वंजारी हे मानसिक रुग्ण असून त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा. त्यांनी काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्यांना उमेदवारी दिली. पूर्व नागपूर हे काँग्रेस मुक्त झाले असल्याने आता ते कसे जिंकून येतील त्याचा त्यांनी विचार करावा असे आव्हान दिले आहे.