रश्मी बर्वे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; जातवैधता प्रमाणपत्र वैधच

उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टातही शिक्कामोर्तब
Rashmi Barve  caste validity certificate case
रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र वैधचPudhari Photo
Published on
Updated on

नागपूर : माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयानेही शुक्रवारी (दि.18) वैध ठरविले आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने जातवैधता समितीवर कठोर शब्दात ताशेरे ओढले होते. जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयामुळे रश्मी बर्वे यांना रामटेक लोकसभा निवडणूक लढवता आली नव्हती. त्यामुळे श्यामकुमार बर्वे यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले होते. आता सुप्रीम कोर्टानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जातवैधता प्रमाणपत्रासंदर्भातील प्रकरणामध्ये बर्वे यांना दिलासा दिला होता. या निर्णयाला राज्य शासनाने आव्हान दिले.

Rashmi Barve  caste validity certificate case
Rashmi Barve : काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना धक्का: सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

उच्च न्यायालयाचा निर्णय बेकायदेशीर असून तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी याप्रकरणी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय दिला. प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय देत उच्च न्यायालयाने जातवैधता समितीवर कठोर शब्दात ताशेरे ओढले होते. याप्रकरणी जात वैधता समितीला दंडही ठोठावण्यात आला. आता याप्रकरणी राज्य शासनाला सर्वोच्च न्यायालयातही धक्का बसला आहे. राज्य शासन उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देईल, ही बाब लक्षात घेता बर्वे यांचे वकील ॲड. समीर सोनवणे यांनी सावधगिरी म्हणून या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयामध्ये आधीच ‘कॅव्हेट’ दाखल करून ठेवले होते. त्यामुळे रश्मी बर्वे यांना दिलासा मिळण्यात मोठी मदत झाली आहे. राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर एकतर्फी अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र यास न्यायालयाने नकार दिला.

Rashmi Barve  caste validity certificate case
Rashmi Barve |नागपूर: रश्मी बर्वे यांना दिलासा, मात्र निवडणुकीची संधी हुकली

लोकसभा निवडणूक सुरू असताना जातवैधता पडताळणी समितीने पारशिवनी तालुक्यातील गोंडेगाव टेकाडी येथील वैशाली देवीया यांची तक्रार दाखल करून घेतली. 28 मार्च 2024 रोजी बर्वे यांचे अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र रद्द केले. काँग्रेसने उमेदवारी देऊनही त्यांना निवडणूक लढविता आली नाही म्हणून बर्वे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. रेकॉर्डवरील ठोस पुरावे लक्षात घेता बर्वे यांचा अनुसूचित जातीचा दावा सिद्ध होत असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. रश्मी बर्वे यांची संधी हुकल्यानंतर काँग्रेसने त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचे ते निष्ठावान आहेत. बर्वे यांचे जात प्रमाणपत्र बनावट कागदपत्राच्या आधारे देण्यात आले, अशी तक्रार सामाजिक न्याय विभागाकडे करण्यात आली त्यानंतर तातडीने बर्वे यांच्या विरोधात जात प्रमाणपत्र रद्दची कारवाई करण्यात आली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news