Nagpur News | रातुम विद्यापीठ माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे निधन

वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nagpur News
रातुम विद्यापीठ माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे निधन Pudhari Photo
Published on
Updated on

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे गुरुवारी (दि.२६ सप्टेंबर) निधन झाले. यकृताशी संबंधित आजारावर स्थानिक खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांची संघर्षज्योत मालवली.

गुरुवारी सकाळी त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

डॉ. सुभाष चौधरी हे यकृताच्या आजाराने मागील काही महिन्यांपासून त्रस्त होते. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यात रात्री प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना उपचारांसाठी मुंबई येथे नेण्याचा निर्णय निकटवर्तीयांनी घेतला होता. त्यानुसार, ‘एअर अ‍ॅम्बुलन्स इंडिया’ या कंपनीशी संपर्क साधून एअर अ‍ॅम्ब्युलन्सची नोंदणी करण्यात आली. त्यासाठी 7 लाख रुपयांचा भरणाही कंपनीकडे करण्यात आला. मात्र वेळेत एअर अ‍ॅम्ब्युलन्स न मिळाल्याने त्यांच्यावर नागपूरातील खाजगी रुग्णालयातच उपचार करण्यात आले.

डॉ. सुभाष चौधरी यांचा जन्म १८ मे १९६५ रोजी झाला. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली. त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव होता. ८ ऑगस्ट २०२० मध्ये त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची धुरा सांभाळली. मध्य भारतातील सर्वात जुने विद्यापीठ असलेल्या नागपूर विद्यापीठाचा शतकोत्तर महोत्सवी सोहळा हा त्यांच्याच कार्यकाळात झाला. या कार्यक्रमांना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यासोबतच जानेवारी २०२३ मध्ये नागपूर विद्यापीठात सुभाष चौधरी यांच्या नेतृत्वात इंडियन सायन्स काँग्रेसचे यशस्वी आयोजन करण्यात आले. कुलगुरू चौधरी हे आपल्या कामात अत्यंत तत्पर होते. त्यांच्या टेबलवर कुठलीही फाईल पेंडिंग राहत नव्हती, यामुळे कार्यकुशल कुलगुरू गमावल्याची भावना व्यक्त झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news