

नागपूर - महाबोधी महाविहार बौद्धगया येथील प्रशासनाच्या विरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि दलित मुक्ती सेनेतर्फे येत्या १२ मे रोजी बुद्ध जयंतीला बुद्धगया ते पाटणा लाँग मार्च काढण्याची घोषणा माजी खासदार, लॉन्ग मार्चचे प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन ही मागणी केली जाईल.
माजी राज्यपाल डी. वाय. पाटील आणि माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आश्वासन दिले. मात्र कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या मार्गाने राज्यकर्त्यांचे डोळे उघडेल. अशी आशा आहे. भारतातील अन्य धर्माची श्रद्धास्थाने त्यांचे अनुयायांच्या ताब्यात आहेत. १९४९ चा महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा रद्द करून फक्त बौद्धांनाच व्यवस्थापन समितीत समाविष्ट करण्यात यावे, या आंदोलनकर्त्यांच्या मागणीला या सर्वांचे समर्थन आहे, असा दावाही प्रा. कवाडे यांनी केला.