कोरटकरला दिलासा, नागपूरचा गुन्हाही कोल्हापूरला वर्ग होणार !

कोरटकरला तात्‍पुरता अटकपूर्व जामीन मंजूर
Prashant Korkatkar granted provisional pre-arrest bail
कोरटकरला दिलासा, नागपूरचा गुन्हाही कोल्हापूरला वर्ग होणार !File Photo
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी सातत्याने चर्चेत असलेल्या आणि नागपूर, कोल्हापूर पोलीस शोधात असलेला प्रशांत कोरटकर याला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 11 मार्चला होणार आहे. दुसरीकडे कोरटकर विरुद्ध नागपुरातही बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल करण्यात झिरो अंतर्गत गुन्हा आता कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

या दोन्ही गुन्ह्यांचा एकत्रित तपास होणार आहे. नागपुरात दीपक रमेश इंगळे रा. पार्वती सहनिवास मानकापूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 फेब्रुवारी रोजी कोरटकर यांनी सावंत यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांना शिवीगाळ करीत धमकी दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केले. जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे समाज भावना दुखावल्या. सामाजिक सद्भावना लक्षात घेता या धमकीची ध्वनिफीत समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज, शिवभक्त संतप्त आहेत. कारवाईच्या मागणीसाठी नागपुरात स्वाक्षरी अभियान राबविले गेले. शनिवारी गांधीगेट ते संविधान चौक पर्यंत स्कूटर रॅली काढण्यात आली. कोरटकर विरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात असतानाच कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने त्याला तूर्तास जामीन देत काहीसा दिलासा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news