

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी आमदार प्रकाश गजभिये (Prakash Gajbhiye) यांची प्रकृती स्थिर आहे. आता त्यांना लवकरच श्रीनगर येथून मुंबईतील लीलावती इस्पितळात दाखल करण्यात येणार आहे.
जम्मू काश्मीरमध्ये सोनमर्ग येथे कुटुंबासह फिरण्यासाठी गेलेले प्रकाश गजभिये (Prakash Gajbhiye) पाय घसरल्याने 24 जानेवारीरोजी गंभीर जखमी झाले होते. बेशुद्धावस्थेत, मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याने तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. व्हेंटिलेटरही मंगळवारी काढण्यात आले.
या संदर्भात माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी संपर्क साधून योग्य ते सहकार्य करण्यास सांगितले. सध्या ते शेरे काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस श्रीनगर येथे उपचारार्थ दाखल आहेत.