

Petrol Tanker Stuck in Nagpur
नागपूर: नागपुरातील सीताबर्डी परिसरात आदिवासी गोवारी उड्डाणपूल ते रहाटे टी पॉइंट जोडणाऱ्या पुलावर आज (दि.३) भर उन्हात चार च्या सुमारास सुमारे 23 हजार लिटर पेट्रोलने भरलेला टँकर अडकला. लोखंडी कठडे लावून जड वाहनास प्रतिबंध असताना हा टँकर या रस्त्याने जाण्याच्या प्रयत्नात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार लागलीच मनपा अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या, वाहतूक पोलिस घटनास्थळी पोहोचले. काही वेळानंतर हा मार्ग पूर्ववत सुरू झाला. एमएच 31 एफसीए 161 क्रमांकाचा हा पेट्रोलने भरलेला आणि रिलायन्स कंपनीचा होता.