MSRTC Suspension | मद्यप्राशन करून कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी परतवाडा आगार व्यवस्थापक निलंबित

Jivan Wankhede | विभागीय चौकशी करून त्यात ते दोषी आढळल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे
MSRTC Manager Suspended
MSRTC Manager Suspended (Pudhari Photo)
Published on
Updated on

MSRTC Manager Suspended

नागपूर: कर्तव्यावर मद्यप्राशन करून कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल अमरावती विभागातील परतवाडा आगार व्यवस्थापक जीवन दत्तात्रय वानखेडे यांना एसटी महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी निलंबित केले आहे. याबरोबरच त्यांची विभागीय चौकशी करून त्यात ते दोषी आढळल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

अमरावती विभागातील परतवाडा आगार व्यवस्थापक हे दिवसभर आपल्या कर्तव्यावर उपस्थित न राहता मद्यप्राशन करून आपल्या शासकीय निवासस्थानी अत्याव्यस्थ अवस्थेत पडले आहेत, अशी माहिती एस टी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाला आगारातील कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवरून कळवली होती. त्यानुसार तेथे एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाने छापा टाकला असता उपरोक्त तक्रारीमध्ये तथ्य आढळले.

MSRTC Manager Suspended
Smart Anganwadi : नागपूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांना स्मार्ट तंत्रज्ञानाचे बळ

एसटीच्या सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापक जीवन वानखेडे यांची अचलपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करून घेतली आणि त्यांच्या विरोधात परतवाडा पोलीस स्थानकामध्ये महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ मधील कलम ८५(१) नुसार गुन्हा नोंद केला. त्यांच्या कर्तव्यातील हलगर्जीपणामुळे अनेक मार्गावरील बसेस रद्द झाल्या. एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news