

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : निवडून येण्याच्या क्षमतेवर उमेदवार दिले तरच विदर्भात महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागेल, अशा शब्दांत काँग्रेसचे आमदार अॅड. अभिजीत वंजारी यांनी ठाकरे गटाला सुनावले. आजच्या बैठकीसाठी दिल्लीकरिता रवाना होण्यापूर्वी सोमवारी ते विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. (Maharashtra Assembly Polls)
मविआत दक्षिण नागपूरवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु आहे. दक्षिण नागपूर हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ आहे. येथील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसला ही जागा मिळाली नाही, तर सांगली पॅटर्न राबविण्याचा इशारा आधीच दिला आहे. (Maharashtra Assembly Polls)
काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी दक्षिण नागपुरातील उमेदवारीचा प्रश्न यावेळी उचलून धरला. आ वंजारी म्हणाले, तिकीट मागण्याचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. मुळात त्या -त्या मतदार संघातील पक्षाची स्थिती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. (Maharashtra Assembly Polls)
दक्षिण नागपूर ही पारंपारिक आमची जागा राहिली आहे. या ठिकाणी अनेक काँग्रेसचे आमदार निवडून आलेत. दक्षिण नागपूरचे आमदार माझे वडील होते. हा काँग्रेसचा गड असल्याने आमच्याकडेच रहावा, ही आमची रास्त मागणी आहे. विदर्भात जास्तीत जास्त जागा काँग्रेसने लढवाव्यात, अशी नेत्यांची भेट घेत विनंती करणार आहोत. थोडक्यात ज्या जागेवर काँग्रेसचे संख्याबळ, नगरसेवक होते. या सर्व ठिकाणी आम्ही मागणी करणार आहोत. रामटेकवरही काँग्रेसचा आग्रह का?, यासंदर्भात बोलताना मी सहा जिल्ह्याचा आमदार आणि अनेक जिल्ह्याचा प्रभारी असल्याने मागणी करणे, रास्त असल्याचे सांगितले.