School Van Drivers Strike : नागपूरमध्ये स्कूल व्हॅन चालकांचा एक दिवसीय संप

School Van Drivers Strike : नागपूरमध्ये स्कूल व्हॅन चालकांचा एक दिवसीय संप
Published on: 
Updated on: 
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : प्रस्तावित मोटार वाहन कायद्याच्या विरोधात आज (दि. ३ जानेवारी) स्कूल व्हॅन चालक संघटना निदर्शने करणार आहेत. संविधान चौकात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ही निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सहसचिव काजी मुस्तकिन यांनी दिली. मंगळवारी (दि. २ जानेवारी) ट्रक चालक, बस चालक, मालक रस्त्यावर उतरले होते. संविधान चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला.
दरम्यान, मंगळवारी सकाळपासून सोशल मीडियावर स्कूल व्हॅन चालक मुलांना शाळेत नेणार नसल्याच्या बातम्या फिरत आहेत. याबद्दल स्कूल व्हॅन चालक संघटनेचे विदर्भ अध्यक्ष अफसर खान यांना विचारले असता फक्त आज (३ जानेवारी) एक दिवस आमचा संप असल्याचे स्पष्ट केले. गुरूवार ४ जानेवारीपासून मुलांना नियमित शाळेत सोडण्यात येईल असेही अफसर खान यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news