

नागपूर : निवडणुकीत एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जाणे अपेक्षित आहे. कोर्टाचा निर्णय जर विरुद्ध आला तर ओबीसीचे नुकसान होणार आहे. हजारो ओबीसी कार्यकर्त्यांचे नुकसान होऊ शकते असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या भवितव्याबाबत ते बोलत होते.सर्वोच्च न्यायालयात वारंवार विचार झाला आहे.27 टक्क्यांचे कँलक्युलेशन करताना फ्रेक्शनमध्ये पॉईंट 50 पेक्षा जास्त असेल तर तो पूर्णांक पकडावा अशी आमची मागणी आहे.ज्या ठिकाणी एस सी आणि एसटी संख्या 45 असेल तर ओबीसी पकडल्यावर 80 टक्क्यांवर जाईल याकडे डॉ तायवाडे यांनी लक्ष वेधले.
सर्व समाजाचे आणि राजकीय नेत्यांचे या निकालाकडे लक्ष आहे. मागील चार-पाच वर्षापासून हे प्रकरण सुरू आहे. गेल्या वेळी महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषद निवडणुकीत सदस्यत्व रद्द झाले होते. आता निवडणुकांना कोर्टाने परवानगी दिली आहे. 27 टक्के आरक्षण प्रमाणे या निवडणूक घेण्याचे ठरवण्यात आले. आम्ही सर्व आनंदी होतो.निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यावर काहीजण कोर्टात गेले. ओबीसी आरक्षण जास्त होत असल्याचे सांगण्यात आले.