

नागपूर - ओबीसी आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही, सरकार ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, याची खात्री बाळगा असा विश्वास पुन्हा एकदा महसूलमंत्री व ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा व कुणबी मराठासंदर्भातील काढलेल्या शासन आदेशावरून सर्वपक्षीय शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही. सरकार ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे आश्वासन दिले आहे. कुणबी प्रमाणपत्रांबाबत समाजात संभ्रम आहे की बोगस प्रमाणपत्रे निघतील.
मी खात्री देतो की, जे खऱ्या अर्थाने पात्र कुणबी मराठा आहेत, केवळ त्यांनाच प्रमाणपत्रे मिळतील. आज नागपुरात ओबीसी मोर्चा निघाला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी संभ्रम दूर करून घ्यावेत. सरकारकडून काहीही चुकीचे होणार नाही, समितीचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः व सरकार याबाबत काळजी घेईल असे स्पष्ट केले.