कारागृहातून बाहेर येताच कुख्यात आराेपी सोनू वासनिकचा गेम

या घटनेनंतर गँगवॉरची शक्‍यता वर्तवली जात आहे
Notorious Sonu Wasnik's murder after coming out of jail
कारागृहातून बाहेर येताच कुख्यात आराेपी सोनू वासनिकचा गेमFile Photo
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

कारागृहातून बाहेर आल्यानंतर एका दिवसातच जुन्या वैमनस्यातून दगडाने ठेचून एका कुख्यात आरोपीची हत्या केल्याची घटना इमामवाडा परिसरात घडली. सोनू उर्फ दीपक विजय वासनिक (वय 44) असे मृताचे नाव असून या घटनेनंतर गँगवॉरची शक्यता रामबाग परिसरात वर्तवली जात आहे.

पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. सोनू वासनिक हा गुन्हेगारी जगतात नामचीन बदमाश म्हणून ओळखला जातो. वर्धा येथे त्याच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, खंडणी यासारखे 70 वर गंभीर गुन्हे दाखल आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने वर्धा पोलिसांनी त्याला एमपीडीए अंतर्गत एक वर्षे कारागृहात रवाना केले होते. मात्र कारागृहातून बाहेर आल्यानंतर एका दिवसातच वैमनस्याने त्याचा जीव घेतला.

काल गुरुवारी मध्यरात्री तो आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासाठी रामबाज परिसरात आला. नातेवाईकांसोबत भेटला व नंतर मित्रांसोबत नेहमीप्रमाणे दारू पिण्यास गेला. दारूच्या नशेत त्याने अनेकांना शिवीगाळही केली. सोनूचा मित्र आकाश प्रफुल्ल मेश्राम भाई 27 एच एस सी यादरम्यान वाद झाला. दोघांची हाणामारी शिवीगाळ धक्काबुक्की पर्यंत गेली व यात आकाशला व त्याच्या मित्रांनी सोनूला दगडांनी मारहाण केली. डोक्यात एक मोठा दगड घातल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी भीमा मळा पोलिसांनी आकाश मेश्राम याला तातडीने अटक केली. इतर आरोपी अजुनही फरार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे यशोधरा पोलिस स्टेशन अंतर्गत आज शुक्रवारी एका लग्न समारंभात झालेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची चाकूने हत्या करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news