

नागपूर : बलात्कार, अपहरण आणि खंडणीचे विविध गुन्हे दाखल असलेल्या रोशन शेख या कुख्यात गुंडाची पोलिसांनी पायी काढलेली वरात आज सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. वाहन नादुरुस्त झाल्याने या कुख्यात आरोपीला पायी नेल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. ब्लॅकमेल करीत तसेच लग्नाच्या आणाभाका घालत बलात्कार करणाऱ्या रोशन शेख याला मंगळवारी पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
रोशन व त्याच्या सहकाऱ्यांवर पोलिसांनी मकोकाची कारवाई केली आहे. एका व्यापाऱ्याला खंडणी मागितल्या प्रकरणी तो कारागृहात होता. सध्या तो कोठडीत आहे. तो महिला व तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांची आक्षेपार्ह चित्रफित तयार करून त्या आधारे त्यांना ब्लॅकमेलही करत होता. एका युवतीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक केली.