Nagpur Political News | ....तर ‘राष्ट्रवादी शरद पवार गट’ असा निवडणूक लढणार!

मित्रपक्षांबरोबर सन्मानजनक आघाडी न झाल्‍यास घेणार निर्णय : स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठक
Nagpur Political News
स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक पार पडलीPudhari photo
Published on
Updated on

नागपूर - लवकरच होणाऱ्या जिल्हापरिषद ,पंचायत समिती, नगर पंचायत, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढत असताना मित्र पक्षांसोबत सन्मानजनक आघाडी न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने पूर्ण जिल्ह्यात लहान मोठ्या सामाजिक संघटनांना सोबत घेऊन निवडणुका लढवाव्या यावर एकमत झाले.

नागपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक जिल्हाध्यक्ष प्रविण कुंटे पाटील यांचे अध्यक्षतेखाली गणेशपेठ येथील पक्ष कार्यालयात संपन्न झाली. बैठकीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशनुसार लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नागपूर जिल्हा परिषदेत झालेला बोगस शिक्षक नियुक्ती घोटाळा , व महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांचे जीवनावर आधारित चित्रपटाला सिनेमा गृह उपलब्ध होण्यासाठी जाणीवपूर्वक केली जाणारी अडवणूक यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Nagpur Political News
Sharad Pawar: शरद पवारांच्या 'पक्षा'ला निवडणूक आयोगाची मान्यता

निवडणूक पूर्वतयारी म्हणून तालुका अध्यक्षांनि त्यांचे तालुक्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरात लवकर तसा अहवाल जिल्हाध्यक्ष यांना द्यावा असे ठरविण्यात आले. सध्या गाजत असलेल्या नागपूर जिल्हा परिषद मध्ये झालेल्या बोगस शिक्षक नियुक्ती घोटाळ्याची ED मार्फत सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व शाळा संचालक यांना कुठलेही राजकीय संरक्षण न देता कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे जीवनावर आधारित चित्रपटाला सिनेमागृह मिळू नये यासाठी जाणीवपूर्वक जातीयवादी शक्तीकडून प्रयत्न सुरू असून या चित्रपटाला शासनाकडून सिनेमा गृह उपलब्ध करून द्यावे व होणारी अडवणूक थांबवून या चित्रपटाला tax फ्री करण्याची मागणी करण्यात आली.

Nagpur Political News
Nagpur News | केदार गटाला धक्का, माजी जि. प. अध्यक्षांच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

बैठकीत याप्रसंगी प्रामुख्याने माजी आमदार प्रकाश गजभिये , प्रदेश उपाध्यक्ष शेखर कोल्हे प्रदेश सरचिटणीस विनोद हरडे, अविनाश गोतमारे, सुरेश गुडधे पाटील, कार्याध्यक्ष किशोर बेलसरे ,महिला जिल्हा अध्यक्ष ,अध्यक्ष सौ वैशाली ताई टालाटूले , रश्मी जामदार , सौ बबिता सोमकुंवर,प्रमिला ताई दरने , प्रेम लता वानखेडे, तालुका अध्यक्ष अनुप खराडे ,गणेश चौधरी, रमेश लांजेवार, विशाल गाडबैल , दिनेश साळवे,,योगेश धनुस्कर, डॉ, रवी शेंडवरे यांचेसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news