NCP Sharad Pawar Faction on Local Body Elections Nagpur
नागपूर: भाजप काँग्रेस, अजित पवार गटाच्या पाठोपाठ आता नागपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने स्वबळावर लढण्याचा संकल्प केला. आज (दि.४) पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी आघाडी न झाल्यास पूर्वतयारीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली.
माजी गृहमंत्री व विदर्भ प्रभारी अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष व प्रदेश प्रवक्ता प्रविण कुंटे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला प्रामुख्याने माजी आमदार विजय घोडमारे, माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी सनदी अधिकारी व नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये, सलील देशमुख, कार्याध्यक्ष किशोर बेलसरे, प्रदेश पदाधिकारी शेखर कोल्हे, विनोद हरडे, अविनाश गोतमारे, सुरेश गुडधे पाटील, प्रेम झाडे, जिल्हा महिला अध्यक्ष डॉ. वैशाली टालाटूले, प्रदेश महिला सरचिटणीस बबिता सोमकुंवर, युवती जिल्हाध्यक्ष रश्मी आरघोडे, अनिता दरने, सेवादल अध्यक्ष योगेश धनुस्कर, पंकज चुकांबे यांच्यासह तालुका अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष , जिल्हा पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांप्रमाणे “महाविकास आघाडीत”एकजूट दाखवत मित्र पक्षांशी स्थानिक आणि प्रदेश पातळीवर संपर्क साधून या बाबत चर्चा करावी, असे ठरविण्यात आले. आघाडी होवो अथवा न होवो, आजच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना स्वबळावर सर्वच्या सर्व जागांवर तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संचालन व नियोजन जिल्हाध्यक्ष व प्रदेश प्रवक्ता प्रविण कुंटे पाटील यांनी केले. कार्यकर्त्यांच्या भावना आणि सूचना पक्षश्रेष्टींपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना देऊन स्थानिक प्रश्नावर आंदोलन व जनजागृती करून पुढील काळात संघटना अधिक गतिमान करण्याचे आदेश दिले.
बैठकीत सर्वश्री, ॲड मृणाल तिघरे, सोहेल पठाण, रमेश लांजेवार, विनोद साळवे, लहू घुग्गुस्कर, सुधीर मोहोड, कपिल वानखेडे, नकुल बरबते, विशाल गाडबैल, शेख रशीद, प्रमोद बरेकर, नाना केने , धर्मपाल वानखेडे, यशवंत बारापत्रे, चंद्रशेखर येवले, मोहन ठाकरे, बबन वानखेडे, विजय ठाकरे, ओम खत्री , डॉ. रवी शेंदवरे, मुकेश पाल, भूपेश भोयर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हिंगणा विधानसभा मतदार संघ निरीक्षक म्हणून माजी मंत्री रमेश बंग व माजी आमदार विजय घोडमारे, काटोल विधानसभा मतदारसंघात निरीक्षक म्हणून शेखर कोल्हे व दीपक मोहिते, उमरेड विधानसभा निरीक्षक म्हणून माजी आमदार प्रकाश गजभिये व विनोद हरडे, सावनेर विधानसभा मतदारसंघात अविनाश गोतमारे, रामटेक विधानसभा किशोर बेलसरे, कामठी विधानसभा माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांची नियुक्ती जाहीर केली. यासोबतच माजी आमदार विजय घोडमारे यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.