

नागपूर : आज राज्यभरात विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमऐवजी बॅलेटने निवडणुका घ्या, अशी मागणी होत आहे. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी आपण १० कोटी रुपये देण्यास तयार आहोत. ईव्हीएम हॅक करून जिंकून दाखवा, असे आव्हान विरोधकांना केले आहे.
ज्यावेळी मी नागपुरातील संविधान चौकातून मुंबईपर्यंत ईव्हीएम हटाव, देश बचाव अशी भूमिका घेतली. त्यावेळी हे सर्व विरोधक झोपले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जनतेने दिलेला कौल न स्वीकारता उगीचच ईव्हीएमला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. येत्या मनपा निवडणुकीत मी १०० उमेदवार उभे करतो, १० कोटी देण्यास मी तयार आहे. मात्र निवडणूक होईपर्यंत तो हॅकर माझ्या ताब्यात राहील, असे आव्हानही त्यांनी यावेळी केले.