रामराज्य की गुंडा राज्य : नाना पटोलेंचा राज्य सरकारवर घणाघात

Nana Patole
Nana Patole
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : लोकशाही विचाराला तिलांजली देत येड्याचं सरकार ती संपवण्याचे काम करत आहेत. अशा सरकारला तत्काळ बरखास्त करायला पाहिजे. सत्तेच्या गर्मीचा हा प्रत्यय आहे, आम्ही स्वच्छ आणि रामराज्य चालवतो म्हणतात पण आता या घटनेवरून हे गुंडाराज सुरू असल्याचे दिसते, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

राज्यातील सरकार लुटेरे आणि डाकू आहे. असे आम्ही आजवर अनेकदा बोललो आहे. जो कोणी आमदाराचं एकत नसेल, मग आयपीएस अधिकारी किंवा कोणी असेल त्याची तत्काळ बदली करा. पोलिसांवर भयानक दबाव जो कधी नव्हे, ते आता आपण बघत आहोत. पोलिसांनी कोणतेही काम करु नये, अशा पद्धतीचे दबावतंत्र गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडून सुरू आहे.

महाविकास आघाडी वाटाघाटी बाबतीत छेडले असता पटोले म्हणाले, अॅड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आहेत. कालची बैठक महाविकास आघाडीची बैठक होती. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक होते, हा काय प्रकार आहे? आम्ही कोणाला बळजबरी करु शकत नाही. केंद्र सरकारचे हे शेवटचे बजेट होते. नरेंद्र मोदी सरकारला पुढचे बजेट ठेवायला मिळणार नाही. महायुतीमध्ये काय चाललं आहे? हे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून दिसून आले. दुसरीकडे महाविकास आघाडीत काहीच अडचण नाही. आम्ही ४८ जागा लढू आणि जिंकू, असा दावा पटोले यांनी केला.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news