Nagpur news
नागपूर
Nagpur news: हमसफर एक्सप्रेसच्या छतावर चढला तरुण, शॉक बसल्याने गंभीर जखमी
मनस्थिती ठीक नसल्याने त्याने हे धाडसी पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे
नागपूर: मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर शुक्रवारी (दि.१२) एक युवक थेट रेल्वे इंजिनच्या टपावर चढल्याने तारांबळ उडाली. रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेला छेद देणारी ही घटना असून या तरुणाला अनेकांनी समजावले मात्र तो ऐकण्याच्या स्थितीत नव्हता.
अखेर जोरदार विजेच्या उच्च दाबाचा शॉक बसल्याने तो प्लॅटफॉर्मवर कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा प्रवासी केरला एक्स्प्रेसने नागपुरात आला. तो कुणाला काही कळण्यापूर्वीच पुणे हमसफर एक्सप्रेसचे छतावर चढला. त्याची मनस्थिती ठीक नसल्याने त्याने हे धाडसी पाऊल उचलले असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

