नागपूर: पोर्च कोसळल्याने मलब्याखाली दबून तरुणाचा मृत्यू

Nagpur News | गणेशपेठ परिसरातील गंगा अपार्टमेंटमध्ये घटना
 porch collapse in Nagpur
गणेशपेठ परिसरात पोर्च कोसळल्याने मलब्याखाली दबून तरुणाचा मृत्यू झाला. Pudhari Photo
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : गणेशपेठ परिसरात गंगा अपार्टमेंटमध्ये असलेल्या दुकानाचा एक पोर्च कोसळल्याने वर्धा जिल्ह्यातील एका तरुणाचा मृत्यू झाला. अजय अशोकराव इंगळे (वय 35, रा. चांदणी कोकडा, जि. वर्धा) असे या मृत युवकाचे नाव आहे. आज (दि.२) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

परिसरातील नागरिकांकडून घटनेची माहिती मिळताच कॉटन मार्केट अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली. अग्निशमनच्या जवानांनी पडलेला मलबा बाजूला करून संबंधित युवकाला बाहेर काढले. व तातडीने मेडिकल रुग्णालयाकडे रवाना केले. मात्र, त्याचा सिमेंट मलब्याखाली दबून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले.

 porch collapse in Nagpur
नागपूर: धावत्या ट्रेनमध्ये हाणामारी; तरुणाचा मृत्यू, चौघांना अटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news