नागपूर हिंसाचार प्रकरणी 13 गुन्हे दाखल, शंभरावर अटकेत !

Nagpur Violence | पोलिस आयुक्‍त रवींद्रकुमार सिंगल यांची माहिती
 Nagpur Violence
प्रातिनिधीक छायाचित्र( AI generated images )
Published on
Updated on

नागपूर- नागपुरातील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत आतापर्यंत 13 FIR दाखल करण्यात आले असून शंभरावर आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

अटक केलेल्‍या अधिकांश जणांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. नागपुरातील संचारबंदी संदर्भात वेळोवेळी आढावा घेऊन निर्णय घेणार आहोत. आज महत्वाचा दिवस होता सर्वांनी सहकार्य केले. आज या संदर्भात आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे. फहीम खान याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमागे बांगलादेश किंवा इतर काही कनेक्शन असल्याबाबत चर्चा सुरू असली तरी तपास सुरू आहे. आजच काही सांगता येणार नाही. वेळोवेळी जी माहिती उघड होईल ती तुम्हाला दिली जाणार असल्याची माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news