

Nagpur Vidhan Bhavan job exam
नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. ८ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार आहे. अधिवेशन कालावधीकरता लिपिक-टंकलेखकाच्या एकूण १० पदांसाठी तसेच शिपाई, संदेशवाहकाच्या एकूण 24 हंगामी, तात्पुरत्या स्वरुपात पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या दोन्ही पदाकरीता दि.7 नोव्हेंबर ते दि.17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले.
दोन्ही पदांसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी निवडीसाठी विधानभवन, नागपूर येथे सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज व विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, नागपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
शिपाई, संदेशवाहक पदाची मुलाखत - दि.25 नोव्हेंबर सकाळी 11.30 वा. लिपिक-टंकलेखक पदाकरीता टंकलेखन चाचणी परीक्षा - दि.28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वा. विधानभवन, नागपूर येथे होईल.