Nagpur Police Raid | हॉटेलमध्ये अल्पवयीनांना हुक्का; पोलिसांचा छापा, आयोजकांसह 5 जणांविरोधात गुन्हा

‘शहर गुलाबी’ कार्यक्रमादरम्यान प्रकार; चौथ्या मजल्यावरील खोल्यांत हुक्का पॉट, फ्लेवरसह साहित्य आढळल्याचा दावा
Police Raid
Police RaidPudhari
Published on: 
Updated on: 

Hotel Tuli International Hookah Raid

नागपूर : नागपूर सदर परिसरातील हॉटेल तुली इंटरनॅशनलमध्ये आयोजित ‘शहर गुलाबी’ कार्यक्रमादरम्यान अल्पवयीन मुला-मुलींना कथितरित्या हुक्का उपलब्ध करून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत माहिती मिळताच सदर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. चौथ्या मजल्यावरील वेगवेगळ्या खोल्यांची तपासणी केली असता काही अल्पवयीन मुले-मुली हुक्का सेवन करताना आढळल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी हॉटेल मालक, व्यवस्थापक आणि कार्यक्रम आयोजकांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री हॉटेल तुली इंटरनॅशनलमध्ये ‘शहर गुलाबी’ नावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते. त्यामध्ये काही अल्पवयीनांचाही समावेश होता. कार्यक्रमादरम्यान हॉटेलच्या काही खोल्यांमध्ये हुक्क्याची व्यवस्था करण्यात आल्याचा आरोप आहे.

Police Raid
Nagpur News : उंदीर पकडण्यासाठी लावलेल्या ग्लू पॅडवर अडकला कॉमन वुल्फ स्नेक; सर्पमित्रांनी केली सुखरूप सुटका

माहिती मिळाल्यानंतर सदर पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकून चौथ्या मजल्यावरील खोल्यांची तपासणी केली. यावेळी हुक्का पॉट, फ्लेवर आणि अन्य साहित्य आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. काही अल्पवयीन हुक्का सेवन करतानाही आढळून आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

खोल्या देताना नोंदी ठेवल्या नसल्याचा दावा

अल्पवयीनांना हॉटेलमधील खोल्या नेमक्या कोणत्या आधारावर उपलब्ध करून देण्यात आल्या, याचीही चौकशी करण्यात येत आहे. संबंधित खोल्या भाड्याने देताना आवश्यक नोंदी ठेवण्यात आल्या नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Police Raid
Nagpur News | मनपाच्या आरोग्य विभागाकडून शहरातील ६६२ नोंदणीकृत रुग्णालयांची तपासणी मोहीम!

या प्रकरणी हॉटेल मालक, व्यवस्थापक फिरोज, इव्हेंट आयोजक नेरुल यांच्यासह मुंबई येथील आबिद शफीक काजी (२०) आणि पनवेल येथील अलीशा मॅन्युअल चेरी (२२) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरोधात कोटपा कायद्यासह विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

हॉटेलच्या खोल्यांमध्ये हुक्क्याची व्यवस्था नेमकी कोणी केली, ती कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली तसेच अल्पवयीनांना खोल्या उपलब्ध करून देण्यासाठी कोणाची परवानगी होती, या बाबींचा सदर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news