नागपूर, पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा आज (दि.१९) विधानभवनाकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी महाराज बाग चौक परिसरात रातुम विद्यापीठाच्या पुढे अडविला. यावेळी मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. बुलडाणा येथून निघालेला हा मोर्चा काल रात्री नागपुरात पोहोचला. Swabhimani Shetkari Sanghatana
आज सकाळी अमरावती रोडमार्गे हा शेतकरी प्रश्नी आक्रमक मोर्चा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करीत, हाती फलक घेऊन विधानभवनकडे निघाला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखल. दरम्यान रविकांत तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. Swabhimani Shetkari Sanghatana
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी विरोधी, पणवती असल्याचा आरोप केला. सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारचे मंत्री पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न १५ डिसेंबरपर्यंत मार्गी लावू, असा शब्द दिला होता. मात्र, अद्याप दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी सुरू केलेली नसल्याने तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर तुपकर यांनी हजारो शेतकऱ्यांना घेऊन १९ डिसेंबररोजी हल्लाबोल आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. आपल्याला दिलेले आश्वासन सरकारने पाळले नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा