नागपुरात रविवारपासून राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलन

Nagpur News | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेते अंकुश चौधरी यांची उपस्थिती
Marathi Language Education Sahitya Sammelan
नागपुरात रविवारपासून राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलन होणार आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्‍यानंतर ‘मराठी ज्ञानभाषा व्‍हावी’ ही जिद्द मनाशी बाळगून ‘आम्‍ही मराठी’ ही चळवळ सुरू करण्‍यात आली. त्‍याअनुषंगाने, नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विदर्भ साहित्य संघ, नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग नागपूर, कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १४ जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे रविवारी ६ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून मराठी सिने कलावंत अंकुश चौधरी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षपद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे भूषविणार असून स्वागताध्यक्ष विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदिप दाते हे राहतील.

याप्रसंगी आमदार अभिजीत वंजारी, मोहन मते, प्रविण दटके, विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रोहिणी कुंभार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सिध्देश्वर काळुसे, डस्कलाईन इंफ्रा. लि. चे संचालक समीर महाजन, विदर्भ साहित्य संघाचे सचिव विलास मानेकर आणि मनपाच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे पियुष आंबुलकर यांची विशेष उपस्थिती राहील ग्रंथ दिंडीचे आगमन व पूजन झाल्‍यानंतर मराठी बँडचे विशेष सादरीकरण होणार आहे.

परिसंवाद, चर्चासत्र कविसंमेलन सोमवार, १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ‘बालभारती आणि मराठी मनाचे नाते’ या विषयावरील परिसंवादात साहित्य अकादमी बालसाहित्यिक पुरस्कार प्राप्त लेखक एकनाथ आव्हाड, मोहन शिरसाट, प्रतिभा इंगोले, प्रकाश एदलाबादकर, मधुकर धर्मापुरीकर या लेखकांचा यात सहभाग राहील. सूत्रसंचालन प्रतिभा लोखंडे आणि ज्ञानेश हटवार करतील.

त्यानंतर ११.४५ वाजता ‘मराठी सद्यस्थिती व ज्ञानभाषा दिशा’ या विषयावरील चर्चासत्रात आ. अभिजीत वंजारी, माजी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, विदर्भ संशोधन मंडळाचे सचिव डॉ. राजेंद्र वाटाणे, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले आणि मराठी अभ्यास मंडळ, पुणे चे सदस्य प्रा. डॉ. पांडुरंग कंद यांचा सहभाग राहील. सूत्रसंचालन प्रा. सुरेश नखाते करतील तर मुलाखत वृषाली देशपांडे घेतील. दुपारी २ वाजता माजी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या उपस्थितीत शिक्षकांचे शैक्षणिक नवोपक्रम सादरीकरण स्पर्धा होईल. सूत्रसंचालन आर. जे. अनूप करतील.

त्‍यानंतर ३.४५ वाजता ‘ज्ञानभाषा प्रवासात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची भूमिका’ या विषयावरील चर्चासत्र होईल. कवी बबन सराटकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. मराठी भाषाप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी संमेलनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे सचिव रमेश बक्षी, आयोजन समितीचे अध्यक्ष रवींद्र काटोलकर, संयोजन सचिव डॉ. वंदना बडवाईक, सहसंयोजक संध्या महाजन यांनी केले आहे.

Marathi Language Education Sahitya Sammelan
नागपूर : 'एचएमपीव्ही' बाबत चुकीची माहिती शेअर केल्यास कारवाई होणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news