

Fund of Rs 100 crore approved for Nagpur's divisional sports complex
नागपूर : जुलै २०२५ च्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेल्या निधीपैकी शंभर कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्याचा शासन निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यानिमित्ताने यश आले आहे.
पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी यांच्या धर्तीवर नागपूर विभागीय क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण व नूतनीकरण करून त्याला राज्यस्तरीय क्रीडा संकुलाचा दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रकल्पामुळे नागपूर व विदर्भातील खेळाडूंना अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होणार असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी नागपूर सज्ज होणार आहे.