Nagpur BLO FIR | कर्तव्यात कसूर : दक्षिण नागपूर मतदारसंघातील 9 बीएलओंवर गुन्हे दाखल

कुठलीही पूर्वसूचना न देता एसआयआरचे काम थांबविल्याने कारवाई
FIR Against Booth Level Officers
FIR Against Booth Level Officers Pudhari
Published on
Updated on

FIR Against Booth Level Officers

नागपूर: निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येणाऱ्या मतदार यादी 'विशेष सखोल पुनर्रिक्षण (एसआयआर) कार्यक्रमांत टाळाटाळ करणाऱ्या दक्षिण नागपूर मतदारसंघातील 9 बीएलओंवर गुन्हे दाखल व करण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाने 'विशेष सखोल पुनरिक्षण-२०२६' (एसआयआर) कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक मतदाराकडून दोन अर्ज भरून घेतले जात असून त्यासाठी ९२ लाख ७६ हजार अर्जाची छपाई करण्यात आली. ४ हजार ६१० बीएलओंसोबत मदतीने एसआयआरचे काम सुरू आहे.

FIR Against Booth Level Officers
Nagpur News: कुटुंबीयांच्या विरोधामुळे प्रेमीयुगुलाने विष प्राशन केलं; प्रियकराचा मृत्यू, प्रेयसी गंभीर

त्यामुळे मुदतीत हे काम पूर्ण होण्यासाठी मोठी यंत्रणा कामी लागली आहे. मात्र, काही बीएलओ अद्याप या कामावर रुजूच झाले नाहीत, तर काहींनी मध्येच काम थांबविले. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या आदेशाच्या अंमलबजावणीस त्यांनी नकार दिला. कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांनी एसआयआरचे काम थांबविल्याने लोकप्रतिनिधी कायदा १०५१च्या कलम ३२ अन्वये, निवडणूक कर्तव्यात सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

कर्तव्यात कसूर करण्याचे कारण देत ही कारवाई झालेल्यांमध्ये प्रवीण घोडके, कल्याणी मारगोडे, लता मेश्राम, सुवर्णा भस्मे, शंकर चांदेकर, सचिन राठोड, स्वाती महाजन, सुनीता मते, पूजा मेश्राम यांचा समावेश आहे.

FIR Against Booth Level Officers
Nagpur News | नागपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी १०० कोटींचा निधी मंजूर

मतदार नोंदणी अधिकारी शिल्पा सोनाडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी १ जुलैला कामठीतील नऊ बीएलओ आणि हिंगणा येथील दोन बीएलओंवर गुन्हे दाखल करण्यात आले. आहेत. आर्थिक कायद्यानुसार तीन महिने शिक्षा ते दोन दंडाची तरतूद आहे, असे निवडणूक शाखेकडून यानिमित्ताने स्पष्ट करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news