Nagpur Crime : नागपुरात देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; अल्पवयीन मुलीसह सज्ञान महिलेची सुटका

महिला आरोपीला अटक; कळमना पोलिसांची कारवाई
Sex trafficking racket
देहविक्री रॅकेटFile Photo
Published on
Updated on

नागपूर : अल्पवयीन मुलीसह सज्ञान महिलेला पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेणाऱ्या महिलेवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (दि.१८) दुपारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एका अल्पवयीन मुलीसह एका सज्ञान पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, महिला आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला कळमना परिसरातील भगत नगर, भरतवाडा रोड येथील प्लॉट क्रमांक १०४ येथे देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दोन पंच व बोगस ग्राहकाच्या मदतीने पथकाने तेथे छापा टाकला.

कारवाईदरम्यान लक्ष्मी किशोर कुर्रे (वय ३६, रा. प्लॉट क्रमांक १०४, भगत नगर, भरतवाडा रोड, कळमना, नागपूर) ही महिला आर्थिक फायद्यासाठी महिलांना व मुलींना कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच ग्राहक उपलब्ध करून देऊन त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस अंमलदार लक्ष्मण चौरे यांच्या फिर्यादीवरून कळमना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३(२), १४३(३) सह अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा १९५६ मधील कलम ३, ४, ५ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news