Nagpur Crime | दारूच्या नशेत भाच्याने केलेल्या हल्ल्यात मामा ठार

घटना पाटणसावंगी परिसरात खळबळ
  Crime  News
Crime NewsPudhari file photo
Published on
Updated on

Drunk Nephew Kills Uncle Nagpur

नागपूर : दारूच्या नशेत एका भाच्याने आपल्याच मामावर सब्बलने प्राणघातक हल्ला करून त्याची हत्या केल्याची घटना पाटणसावंगी परिसरात घडली. केसरी गजू कावरे (वय ५०, रा. आरा मशिन परिसर, पाटणसावंगी) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी सूर्यकांत नागेश्वर यास अटक केली.

किल्लापुरा (पाटणसावंगी) येथील सूर्यकांत कलतराम नागेश्वर (वय २१) हा दारूच्या नशेत मामाच्या घरी आला. किरकोळ कारणावरून या दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात सूर्यकांतने सब्बलने मामावरच हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

  Crime  News
Nagpur Crime | दरमहा 30 हजार देणे थांबवले,शिक्षकावर प्राणघातक हल्ला!

या घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news