नागपुरात ग्रामीणमध्ये सहा नवीन पोलीस ठाणी

New police stations: राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
New police stations
प्रातिनिधिक छायाचित्र file photo
Published on
Updated on

नागपूर : नागपूर ग्रामीण भागातील कायदा, सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने सहा नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ग्रामीणमधील वडोदा, बाजारगांव, मोहपा, पाचगाव, नांद आणि कान्होलीबारा या सहा ठिकाणी नवीन पोलिस ठाण्यांची उभारणी करण्यात येणार आहे.

महसूलमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांचीही उपस्थिती होती.

गुन्हेगारी रोखण्यास होणार मदत

नवीन पोलिस ठाण्यांमुळे गावांमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा भाव वाढेल. नागपूर ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्थेसाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल असा विश्वास महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news