Nagpur News : नागपुरातील 99 महसूल कर्मचाऱ्यांना दिवाळीत पदोन्नतीची भेट!

Promotion
PromotionPudhari
Published on: 
Updated on: 

नागपूर - जिल्हाधिकाऱ्यांच्या आस्थापनेवरील महसूल सहायक, सहाय्यक महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्गातील पदोन्नती कोट्यात रिक्त असलेली पदे महसूल कर्मचारी प्रशासनाचा कणा आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली 5 नोव्हेंबर रोजी विभागीय पदोन्नती समितीची सभा घेण्यात आली, आणि आज दुसऱ्याच दिवशी दिवाळी निमित्ताने 99 कर्मचाऱ्यांच्या हातात आदेश देऊन पदोन्नतीची अनोखी भेट त्यांना दिली.

यामध्ये शिपाई संवर्गातून महसूल सहायक संवर्गात 8 कर्मचाऱ्यांना, महसूल सहायक संवर्गातून सहाय्यक महसूल अधिकारी संवर्गात 52 कर्मचाऱ्यांना, ग्राम महसूल अधिकारी संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात 39 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी पात्र ठरविण्यात आले.

रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार 8 शिपाई कर्मचाऱ्यांना महसूल सहायक संवर्गात, 12 महसूल सहायक यांना सहाय्यक महसूल अधिकारी संवर्गात व 4 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांना मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नती देण्यात येवून पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.