

Nagpur Heavy Rainfall
नागपूर : उपराजधानी नागपुरात 1911 साली 24 तासांत आजवरच्या सर्वाधिक ३१५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. तीन दिवस सततच्या पावसाने अतिवृष्टीच्या आठवणींना उजाळा मिळाला. मागील तीन दिवस झालेल्या नागपुरातील संततधार पावसाची नोंद २०२.४ मिलिमीटर इतकी करण्यात आली आहे.
या शतकातील हे एक दिवसातील दुसऱ्या क्रमांकाचे तर शहराच्या इतिहासात पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक पर्जन्यमान होते. यापूर्वी 2018 मध्ये 282 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली. इतिहासात 1911 साली आजवरच्या सर्वाधिक ३१५ मिलीमीटर पावसाची नोंद उपराजधानी नागपुरात करण्यात आली होती. एकप्रकारे एकीकडे सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. अशा वातावरणात महिनाभरापासून पावसाची वाट पाहत असलेल्या नागपूरकरांना गेल्या तीन दिवसांपासून पावसाने ओलेचिंब,गारेगार केले. आज गुरुवारी मात्र सूर्य देवाचे दर्शन झाले आणि काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे उद्ध्वस्त झालेले संसार सावरण्याची धडपड सुरू झाली आहे.