'मैं हू नागपूर का किंग...!; व्हिडिओ व्हायरलप्रकरणी राजा गौस, गजा मारणेसह तिघांवर गुन्हा

Nagpur Crime News | इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हिडिओ शेअर
Nagpur Crime News
प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: पुण्यातील गुंड गजा मारणे आणि नागपुरातील कुख्यात सय्यद राजा गौस यांच्यासह आणखी तिघांवर नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर सामान्य जनतेत, गुन्हेगारी विश्वात दहशत निर्माण करण्याच्या दृष्टीने इंस्टाग्रामवर 'मैं हु नागपूर का किंग...! अशी पोस्ट करणे या गुंडांना महागात पडली आहे. (Nagpur Crime News)

नागपुरातील कुख्यात राजा गौस याने इंस्टाग्राम अकाउंटवरून गजा मारणे सोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये राजा गौस आणि गजा मारणे हे गाड्यांच्या ताफ्यासह दिसत होते. यास किंग ऑफ नागपूर ... असे टायटल देऊन हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur Crime News
नागपूर : जैन मंदिरात चोरी; चांदीच्या पाच मूर्तीसह दानपेटीतील रक्कम लंपास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news