Nagpur-Pune Vande Bharat Express: नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसने इतिहास रचला, देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत सेवा सुरू

Nagpur Pune train service latest update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 ऑगस्ट 2025 रोजी या सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला
Nagpur Pune train service latest update
Nagpur Pune train service latest updatePudhari Photo
Published on
Updated on

नागपूर: महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी ऐतिहासिक क्षण ठरला आहे. नागपूर (अजनी) ते पुणे दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आता देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत ट्रेन ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 ऑगस्ट 2025 रोजी या सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, ज्यामुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना जलद, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रातील दोन मोठ्या शहरांमधील अंतर आता केवळ 12 तासांत पार करता येणार आहे. या सेवेमुळे स्थानिक अर्थव्यवस्था, शिक्षण, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे. प्रवाशांसाठी ही सेवा आधुनिक भारताच्या प्रगत रेल्वे व्यवस्थेचे प्रतीक ठरली आहे.

भारत एक्सप्रेसची महत्वाची वैशिष्ट्ये

  • एकूण अंतर: 881 किलोमीटर – देशातील सर्वाधिक लांब वंदे भारत मार्ग

  • प्रवासाचा कालावधी: अवघ्या 12 तासांत नागपूर (अजनी) ते पुणे

  • सेवा प्रारंभ: 11 ऑगस्ट 2025 पासून पुणे-अजनी, 12 ऑगस्ट 2025 पासून अजनी-पुणे दरम्यान नियमित सेवा

  • स्टॉप्स: वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन

  • कोच रचना: एकूण 8 कोच – 1 एक्झिक्युटिव्ह चेअर कार, 7 चेअर कार; एकावेळी 590 प्रवासी क्षमता

वेळापत्रक

मार्ग : प्रस्थान, आगमन, दिवस

  • पुणे-अजनी (26101) : 06:25 वाजता, 18:25 वाजता (मंगळवार वगळता 6 दिवस)

  • अजनी-पुणे (26102) : 09:50 वाजता, 21:50 वाजता (सोमवार वगळता 6 दिवस)

प्रत्येक स्थानकावर आगमन-प्रस्थानाची अचूक वेळ रेल्वेच्या अधिकृत वेळापत्रकात उपलब्ध करून आहे.

तिकीट दर

स्थानक : चेअर कार (₹) ते एक्झिक्युटिव्ह चेअर कार (₹)

अजनी-पुणे: 2140 रुपये ते 3815 रुपये

वर्धा-पुणे: 2040 ते 3650

बडनेरा-पुणे: 1905 ते 3405

अकोला-पुणे: 1825 ते 3210

शेगाव-पुणे: 1795 ते 3150

अहमदनगर-पुणे: 750 ते 1270

अहमदनगर-शेगाव: 1340 ते 2360

स्थानिक आणि प्रवाशांसाठी महत्त्व

  • विद्यार्थी, व्यापारी, सरकारी कर्मचारी, पर्यटक सर्वांसाठी जलद आणि आरामदायी प्रवासाची सुविधा.

  • विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील संपर्क – व्यापार, शिक्षण आणि पर्यटनाच्या दृष्टीने मोठा लाभ.

  • रेल्वेच्या विकासात मैलाचा दगड – महाराष्ट्रातील ही 12वी वंदे भारत सेवा असून, राज्याच्या प्रगत प्रवास व्यवस्थेत मोठी भर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news