Nagpur News | नागपुरातील थकबाकीदार मालमत्ता करधारकांचे टीव्ही, फ्रीज जप्त करणार : वसुलीसाठी ४०० कर्मचारी मैदानात

बँक खातीही गोठवणार, २० ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान मनपाची विशेष वसुली मोहीम, २ हजार ४०० कोटी मालमत्ता कर थकीत
Nagpur Muncipal Election
Nagpur Muncipal corporation
Published on
Updated on

नागपूर : नागपूर शहरातील थकबाकीदार मालमत्ता करधारकांविरुद्ध नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला आहे. व्यावसायिक आस्थापनांचे बँक खाते गोठवणे तसेच नळ आणि सीवर जोडणी खंडित करण्याचे थेट निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले आहेत. तसेच मागील काही वर्षांपासून जवळपास २ हजार ४०० कोटी मालमत्ता कर थकीत आहे.

त्यापैकी कमीत कमी १ हजार कोटीची वसुली करण्याचे उदिष्ट ठेवून कार्य करण्याचे निर्देश आयुक्त डॉ.विपीन यांनी दिले. तसेच थकीत करवसुलीसाठी येत्या २० ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत विशेष वसुली मोहीम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 सदर येथील जिल्हा नियोजन भवनात मनपा कर संग्रहकांची विशेष आढावा बैठक पार पडली. बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगनंथम एम., श्री. मिलिंद मेश्राम यांच्यासह दहाही झोनचे सहायक आयुक्त, कर संग्रहक व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत आयुक्त डॉ. विपीन यांनी प्रत्येक झोन कार्यालयाने थकीत करवसुलीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, तसेच पूर्णतः व्यावसायिक, संमिश्र वापर, अनिवासी तसेच मोकळ्या भूखंडांवरील थकबाकी वसुलीस प्राधान्य दिले जाईल. यासाठी नियम ४२ अन्वये वॉरंट बजावून थेट घर मालकाच्या मालकीचे टीव्ही, फ्रीज व स्थावर मालमत्ता जप्त करण्यात यावी, सेवा व शुल्क विभागामार्फत संबंधित व्यावसायिक आस्थापनांचे बँक खाते क्रमांक मिळवून खाती गोठवण्याची कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात यावी, घनकचरा व्यवस्थापन व जलप्रदाय विभागाच्या सहकार्याने संबंधित इमारतींची सीवर लाईन व नळ जोडणी तात्काळ खंडित केली जावी, ५ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ७०३ मालमत्ता, तर १ ते ५ लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या ३,९२४ मालमत्तांवर विशेष लक्ष केंद्रित केले जावे, थकबाकीदारांना जागेवरच कर भरता यावा यासाठी पथकांकडे पीओएस मशिन्स उपलब्ध असतील.

या विशेष मोहिमेसाठी कर विभागासह इतर विभागांतील ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, दर आठवड्याला मोहिमेचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना आवाहन आहे की, कोणत्याही प्रकारची शास्ती माफ होणार नाही, त्यामुळे कोणत्याही भ्रमात न राहता थकीत मालमत्ता कर मनपा निधीत जमा करावा. असे आवाहनही केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news