श्री विसर्जनासाठी ठिकठिकाणी गर्दी; नागपूरच्या राजाला निरोप

Nagpur Ganesh Visarjan | गणेश विसर्जनासाठी ४१९ कृत्रिम तलावाची व्यवस्था
Nagpur Ganesh Visarjan
मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या नागपूरच्या राजाला निरोप देण्यात आला आहे.File photo
Published on
Updated on
राजेंद्र उट्टलवार

नागपूर: गणपती बाप्पा मोरया...पुढल्या वर्षी लवकर या...! अशा भक्तीमय वातावरणात गणेशभक्तांनी आज (दि.१७) श्री विसर्जनासाठी ठिकठिकाणी कृत्रिम तलाव, टँकवर गर्दी केली आहे. ढगाळ वातावरण तयार झाले असले तरी हजारो गणेशभक्तांच्या उत्साहापुढे वरुणराजालाही माघार घ्यावी लागली. आज अनंत चतुर्दशीनिमित्ताने मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या नागपूरच्या राजाला निरोप देण्यात आला. मोठ्या प्रमाणावर घरगुती गणेशमूर्तीचे आज तर उद्या सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन होणार आहे.

विसर्जन मिरवणुकांची धूम लक्षात घेता शहर व जिल्ह्यात 4500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखा उपायुक्त श्वेता खेडकर, तीन अतिरिक्त पोलिस आयुक्त,10 उपायुक्त,12 सहाय्यक आयुक्त, 300 पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी,1300 होमगार्ड या बंदोबस्तात सज्ज आहेत.

कोराडी व फुटाळा कृत्रिम तलावावर मोठ्या गणेशमूर्तीचे विसर्जन होणार असून मंडळ पदाधिकारी व नागरिकांनी संयम ठेवावा, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. शहरातील वाहतूक नियोजनाची जबाबदारी उपायुक्त शशिकांत सातव यांच्याकडे आहे. विशेष पोलीस पथक विसर्जन मिरवणुकीत लक्ष ठेवून असणार आहे. महापालिकातर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी 419 कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजवर दीड दिवस, पाच दिवस याप्रमाणे हजारो श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन विविध ठिकाणी करण्यात आले. जनजागृतीमुळे नागरिकांनी मोठया संख्येत मातीच्या श्रीगणेश मूर्तीची स्थापना यावेळेस केली. तलावांच्या संरक्षणासाठी मनपातर्फे घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था शहरातील विविध प्रभागात करण्यात आली आहे. यात कच्छी वीसा ओसवाल भवन, गांधीसागर तलाव, सोनेगाव तलाव येथे मोठे कृत्रिम टँक निर्माण करण्यात आले आहेत.

तर सार्वजनिक गणेश मंडळासाठी कोराडी येथे विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश भक्तांच्या सोयीनुसार शहरात ४१९ विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय सेट्रिंगचे ३३१, रबरीचे 31, खड्डे करून 32, कॉक्रीटचे 3 आणि फिरते 22 टँक राहणार आहेत. यात लक्ष्मीनगर झोन मध्ये ३९, धरमपेठ झोन मध्ये ७१, हनुमान नगर झोन मध्ये ५३, धंतोली झोन मध्ये २८, नेहरूनगर झोनमध्ये ४७, गांधीबाग झोनमध्ये ५६, सतरंजीपुरा झोनमध्ये ३०, लकडगंज झोनमध्ये ३८, आशीनगर झोन मध्ये १८ आणि मंगळवारी झोन मध्ये ३८ तसेच कोराडी येथे १ अशा एकूण ४१९ कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Nagpur Ganesh Visarjan
नागपूर : राज्यपालांशी झालेल्या संवादातून ‘त्या’ युवकांचा एकात्मतेचा संकल्प

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news