

Parinay Fuke Statement
नागपूर : आज ज्याप्रकारे शरद पवार किंवा सुषमा अंधारे यांनी टीका केली, ती पाहता त्यांना राजकीय कावीळ झाली असल्याचा आरोप भाजप आमदार परिणय फुके यांनी माध्यमांशी बोलताना केला. मुळात त्यांचा दृष्टिकोन असा आहे की काहीही घडलं, तरी त्यामागे भाजपच असतो! ते कोणताही विषय असो, त्यात भाजपवर टीका करायची संधी शोधतात. बाकी त्यांना दुसरं काहीही काम नाही असं मला वाटतं. मुळात या घटनेला राजकीय रंग देऊ नये. आरोपी कोण आहेत, हे शोधून त्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे.
गोंदिया जिल्हा बँक निवडणूक संदर्भात छेडले असता भाजपचा दावा आहे. आमचाच अध्यक्ष होणार आहे. गोंदिया जिल्हा या बँकेच्या अध्यक्षपदावर महायुतीचाच विजय होणार आहे. २० पैकी १४ सदस्य आमच्या सोबत आहेत. आणखी १-२ सदस्यांशी संपर्क सुरू आहे. आमचाच अध्यक्ष होणार हे निश्चित आहे.
भारतीय जनता पक्षाचे कामकाज संपूर्ण राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचं नेतृत्वात महाराष्ट्रातही मोठी विकासकामं सुरू आहेत.
अनेक नेते, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत बघितली तर हा एक चांगला विनोदी शो आहे असे मला वाटते अशी टीका फुके यांनी केली.