नागपूर : 32 गोवंश जनावरांसह ट्रक पोलिसांनी घेतला ताब्यात

Cattle truck seized: एकूण २३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त
Cattle smuggling
अवैधरित्या नेली जाणारी 32 गोवंशीय जनावरे.pudhari photo
Published on
Updated on

नागपूर : जबलपूर ते नागपुर रोडवर नाकाबंदी सुरू असताना बोर्डा गावाजवळ एका आयशर ट्रक क्र MH३४BG९१४३ मध्ये अवैधरित्या नेली जाणारी 32 गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली आहेत.

३ आरोपींविरुद्ध पोलिस स्टेशन कन्हान येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ६ लाख ४० किमतीचे ३२ गोरे, 17 लाखांचा आयसर ट्रक असा एकूण २३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार , अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ व पोलीस उप-अधीक्षक विजय माहुलकर व पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

कन्हान येथील वाहतुक अंमलदार हेड कॉन्स्टेबल विजय तायडे, रवींद्र बर्वे,अतुल धुमणे, मनीष चौहान, सुधीर यादव यांनी पो. स्टे. कन्हान हद्दीत हे गोवंश घेऊन जाणारे वाहन पकडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news