नागपूर : दुचाकीला धडक दिल्याने पोलिस कर्मचाऱ्याने फोडल्या कारच्या काचा

सिव्हिल लाइन्स येथील घटना
Nagpur News
दुचाकीला धडक दिल्याने पोलिस कर्मचाऱ्याने कारच्या काचा फोडल्याची घटना नागपुरात घडली.File Photo
Published on
Updated on

नागपूर : नागपुरात एका पोलिस कर्मचाऱ्याने हातात वीट घेऊन कारच्या काचा फोडल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.१) सांयकाळी सिव्हिल लाइन्स येथील खोखा कॅफेजवळ घडला. कारची पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला धडक लागल्याच्या भांडणातून त्याने काचा फोडल्याचे सांगितले जात आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, व्हिडीओमध्ये दिसणारा पोलीस कर्मचारी राजकुमार कनौजिया असून अंबाझरी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून कार्यरत आहे. काल (मंगळवारी) रात्री १० च्या सुमारास एका कारचालकाने कार मागे घेत असताना या पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला धडक दिली. यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. भांडण हळूहळू वाढत गेल्याने त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाद सुरू असताना राजकुमारने रागाच्या भरात मोठी वीट उचलली आणि कारच्या खिडकीच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये राजकुमार कनौजिया कारच्या काचा फोडत असताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनौजिया यांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणात कारचालकाने कोणतीही अधिकृत तक्रार दिली नाही. त्यामुळे अद्याप कायदेशीर कारवाई झालेली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news