HSC Paper Leak | पेपरफूटी प्रकरण: आणखी चौघांना अटक, चार दिवसांची कोठडी, आणखीही शिक्षकांवर नजर

अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक आणि दोन शिकवणी वर्ग संचालकांचा समावेश
Nagpur Paper Leak Case Arrest
Nagpur Paper Leak Case ArrestPudhari
Published on
Updated on

Nagpur Paper Leak Case Arrest

नागपूर: सेंट उर्सुला शाळेच्या केंद्रावर इयत्ता बारावीच्या केमिस्ट्री, फिजिक्स आणि गणित पेपरफुटीप्रकरणी सदर पोलिसांनी आणखी चौघांना अटक केली असल्याने आरोपींची संख्या आता 8 झाली आहे. चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. नव्याने अटक झालेल्यांमध्ये एक अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक आणि दोन शिकवणी वर्ग संचालकांचा समावेश आहे.

या कारवाईनंतर अटक झालेल्या आरोपीत दिनेश कोटांगळे, प्रदीप जांगडे, मनीष शंभरकर आणि संदीप सरटकर अशी आरोपींची भर पडली. विद्यासाधना शाळा चालविणारा संदीप सरटकर हा यातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे. सकाळी 11 वाजता पेपरची वेळ असताना 10.37 वाजताच तो विद्यार्थ्यांच्या वॉट्सअप ग्रुपला कसा आला याचा सखोल तपास सुरू असून पोलिस तपासात जांगडे आणि सरटकर यांनीच ही प्रश्नपत्रिका बाहेर काढल्याचे समोर आले.

Nagpur Paper Leak Case Arrest
Nagpur paper leak case: शिक्षण मंडळामार्फतही चौकशी सुरू, पेपरफुटीचा इन्कार

एका विद्यार्थिनीच्या मोबाइलमध्ये 16,18 फेब्रुवारी रोजी फिजिक्स,केमिस्ट्रीचा पेपर आढळल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. 'टेक १' व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रश्नपत्रिका व उत्तरे शेअर झाल्याचे निष्पन्न झाले असल्याने आरोपींची संख्या वाढली आहे.

पोलिसांसोबतच विभागीय शिक्षण मंडळ यात तपास करीत असले तरी आधी पेपरफुट नसल्याचा दावा करणारे विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ शिवलिंग पटवे यांनीही आता पोलिस सखोल तपास करीत असून अटकेतील आरोपींची संख्या सतत वाढत आहे. दोषींवर कारवाई होणारच अशी सावध भूमिका घेतली आहे. एकंदरीत या पेपरफुट प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने आणखीही काही शिक्षक, शिकवणी वर्ग संचालक आरोपी रडावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news