Nagpur District Rain Forecast
नागपूर जिल्ह्यात मंगळवारी ऑरेंज अलर्ट(Pudhari Photo)

Nagpur Weather Alert | नागपूर जिल्ह्यात मंगळवारी ऑरेंज अलर्ट; अति मुसळधार पावसाचा इशारा

नाग नदी, पिवळी नदीच्या पाणी पातळीत वाढ
Published on

Nagpur District Rain Forecast

नागपूर : नागपुरात आज (दि.७) पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने नाग नदी, पिवळी नदी दुथडी भरून वाहत असून नदी, नाल्याकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अनेक सखल भागात पाणीच पाणी झाले असून वातावरणात गारवा निर्माण केला आहे. भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यामध्ये ७ ते ९ जुलै या कालावधीमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे.

दिनांक ७ व ८ जुलै या कालावधीकरिता ऑरेंज अलर्ट दिलेला असून ऑरेंज अलर्ट कालावधीमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये, व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.

 Nagpur District Rain Forecast
Nagpur Water Quality | नागपूर शहरातील विहिरींचे 20 टक्के पाणी नमुने फ्लोराईड युक्त!

जल पर्यटन स्थळी अती उत्साहीपणा दाखवित जीव धोक्यात घालणारी कुठलीही कृती करू नये. शक्यतोवर पाण्यामध्ये उतरण्याचे धाडस करू नये. नदी, नाले दुथडी भरून किंवा पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असते. अशा वेळी चुकूनही तो पूल किंवा रस्ता चालत किंवा गाडी मधून ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. आवश्यक खबरदारी घेवून स्वतःची त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबियांची व परिवाराची अशा ठिकाणी आवश्यक काळजी घ्यावी. जिल्ह्यातील समस्त नागरिकांना व शेतकऱ्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news