

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: मकर संक्रांतीच्या निमित्ताने शहर पोलीस आणि महापालिकेने अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करीत जप्त केलेला मांजा नष्ट केल्यानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर सुरू होता. सीताबर्डी पोलीस स्टेशनमधील एक महिला पोलिस नायलॉन मांजामुळे जखमी झाली. दुचाकीवर आपल्या कर्तव्यावर येत असताना त्यांच्या नाकाला मांजामुळे जखम झाली. तातडीने नजीकच्या लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. (Nagpur News)
दरम्यान, मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पूर्वसंध्येला नागपूर शहर पोलिसांनी सुमारे 18 लाख रुपयांचा नायलॉन मांजा नष्ट केला. नायलॉन मांजाच्या हजारो चकऱ्यावर नागपूर शहर पोलिसांनी बुलडोजर फिरवला. मंगळवारी महापालिकेच्या पथकाने रेशिमबाग मैदानांवर धाड कारवाई केली. (Nagpur News)
मात्र, दोघेजण साधा मांजावर पतंग उडविताना दिसले. याचाच अर्थ मोठ्या प्रमाणात गच्चीवर नायलॉन मांजा वापर केला जात आहे. मकर संक्रांत ही पतंगबाजासाठी ओ काट....ओ पार.... ! असे म्हणत पतंग पेच लढविणे, शर्यत लावण्यासाठी मोठी पर्वणी असते. नागपुरात 14 जानेवारी ते 26 जानेवारी गणराज्यदिनाच्या पर्यंत पतंगबाजी जोरात असते. (Nagpur News)
गच्ची गच्चीवर, गल्लीबोळात या पतंगाचा पाठलाग करताना अनेकजण आपला जीवही धोक्यात घालतात. गेली काही वर्षे नायलॉन मांजाचा वाढता वापर पक्षी आणि मानवांसाठी जीवघेणा ठरत आहे. मकर संक्रांतीच्या या काळात अनेकांचा गळा, नाक कापला जातो. अनेकजण गंभीर जखमी होतात. पक्षांचा हकनाक जीव जातो.