Ajit Parse Nagpur Death| अनेकांना गंडा घालणारा कुख्यात अजित पारसे याचे निधन

गेली अनेक दिवस अजित पारसे यकृत आणि स्वादूपिंडाच्या आजाराने ग्रस्त
Ajit Parse Nagpur Death| अनेकांना गंडा घालणारा कुख्यात अजित पारसे याचे निधन
Published on
Updated on

नागपूर: स्वतःला सोशल मीडिया आणि सायबर तज्ञ अशी बिरुदावली घेत सामाजिक वर्तुळात मिरविणारा आणि अनेकांना मोहजाळात अडकवून गंडा घालणारा अजित पारसे यांचे बुधवारी (दि.04) रात्री निधन झाले. गेले अनेक दिवस अजित पारसे यकृत आणि स्वादूपिंडाच्या आजाराने ग्रस्त होता.

अजित पारसे याने अनेक नेत्यांसोबतचे छायाचित्र आणि माध्यमांमध्ये आलेल्या बातम्याद्वारे आपली वेगळी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून त्याने अनेकांना कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करीत मोठा गंडा घातला.

महाल येथील डॉ. राजेश मुरकुटे यांनी धाडस करीत त्याच्या विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये पहिली तक्रार केली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध अनेक प्रकरणे समोर आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. काही दिवसापूर्वीच तुरुंगातून जामीनावर बाहेर आला होता. अजित उत्तम बास्केटबॉलपटू देखील होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news