NMC Hospital Upgrade | नागपूर महापालिका रुग्णालयांचे पीपीपी तत्वावर बळकटीकरण

रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरविण्याचे महापौर निता ठाकरे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Nagpur Municipal Corporation Medical Facilities
महापौर निता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली Pudhari
Published on
Updated on

Nagpur Municipal Corporation Medical Facilities

नागपूर : एलएडी चौकातील महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय तसेच पाचपावली सुतिका गृहाचे बळकटीकरण करून रुग्णांना चांगल्या व अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सार्वजनिक, खासगी व भागीदारी (पीपीपी) तत्वावर मनपाच्या रुग्णालयाची देखरेख, व्यवस्थापन व संचालन करण्याच्या संदर्भात महापौरांनी डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, आरोग्य विशेष समितीच्या सभापती मनीषा अतकरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, प्रकल्प अभियंता राजीव गौतम, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार उपस्थित होते.

Nagpur Municipal Corporation Medical Facilities
Nagpur Waste Project | भांडेवाडी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचऱ्याचे ढिगारे कमी होणार

यावेळी गांधीनगर परिसरात असलेले इंदिरा गांधी रुग्णालयाचा तिसरा माळा खासगी हॉस्पिटलला पीपीपी तत्वावर देऊन नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात सादरीकरण करण्यात आले. यात 16 बेडचे आयसीयू कक्ष सुद्धा उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पाचपावली भागातील पाचपावली सुतिकागृहात या पद्धतीने आरोग्य सुविधा बळकट करण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगितले. पीपीपी तत्वावर ही रुग्णालये विकसित केल्यास गरीब व वंचित नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असेही डॉ. सेलोकर यांनी यावेळी सांगितले.

शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक असे सहा नवे विधान नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (यूपीएचसी) उभारण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरात असलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बळकटीकरण संदर्भात प्रशासनाने आराखडा तयार करावा, असे निर्देश महापौर ठाकरे यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news