HSC Paper Leak Nagpur News| धक्कादायक! शिक्षकांनीच फोडले बारावीचे 2 पेपर, गुन्हा दाखल

Maharashtra HSC Paper Leak 2026 | कॉपीमुक्त अभियानाचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर स्वत: परीक्षा सेंटरवर
HSC Paper Nagpur News
HSC Paper Nagpur News
Published on
Updated on

नागपूर : बारावीचे फिजिक्स, केमेस्ट्री असे दोन पेपर फुटल्याप्रकरणी सदर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेंट उर्सुला शाळेतील एका विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये व्हाट्सअपवर (WhatsApp) हा पेपर आला होता. वॉशरूमच्या निमित्ताने ती सतत बाहेर ये जा करीत होती. या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आला आणि पेपर फुटल्याचे बिंग फुटले.

याप्रकरणी सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचेही राज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केले. 15 विद्यार्थ्यांचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला होता. या माध्यमातून खाजगी शिकवणी वर्गाच्या एका शिक्षकाने पैसे घेऊन हे पेपर त्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर उत्तरासह शेअर केल्याचे तपासात उघडकीस आले.

यातील दोन विद्यार्थिनी या केंद्रावर होत्या आता उर्वरित तेरा विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. दुसरीकडे राज्यात कॉपीमुक्त अभियान सुरू आहे. याच अभियानाचा आढावा घेण्यासाठी आज (दि.२१ फेब्रुवारी) शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी नागपुरातील संताजी महाविद्यालयात धडक दिली. विद्यार्थ्यांच्या सुविधांचीही त्यांनी यावेळी माहिती घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news